बाळासाहेब बढे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मोफत आरोग्य सुविधा
1 min read
४०० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊचे वाटप
वडगाव कांदळी:- कांदळी गावचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी आदर्श सरपंच बाळासाहेब शिवाजीराव बढे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगदवाडी (ता. जुन्नर)येथे विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगदवाडी, न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १४ नंबर या शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी बाळासाहेब बढे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वैभव काळे, माजी उपसरपंच सुनील गुंजाळ, शांताराम घाडगे, नारायण भोर, मुरलीधर गुंजाळ ,रघुनाथ बढे, महेश बढे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे ,बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे , कांदळी गावचे माजी उपसरपंच अनिल बापू भोर, ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे, नगदवाडी सोसायटी चेअरमन पोपट बढे,दिनकर कुतळ, विश्वास बढे, शिवशंकर मांडे, गणेश भोर, संगीता बढे ,अक्षदा जाधव, दयानंद बढे,अक्षय बढे, दिनेश घाडगे ,मच्छिंद्र घाडगे, शांताराम बढे ,अशोक जगताप, महेश बढे ,चंद्रकांत बढे ,दिनकर बढे ,संपत बढे, सोमनाथ कुतळ, अथर्व बढे, संतोष बढे ,बाबाजी बढे, नवनाथ नेंद्रे,जितेंद्र शिंदे, अभिजीत बढे,केंद्रप्रमुख वनिता हांडे ,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे व सर्व शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक घाडगे व सर्व शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश मेहेर यांनी केले सूत्रसंचालन डॉ. दीपक घाडगे ,सुनील गुंजाळ, अक्षय बढे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब बढे यांनी मानले.

कांदळीतील ग्रामस्थांना मोफत आरोग्य सुविधा
कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळी गावातील आर्थिक दुर्बल असलेल्या सर्व नागरिकांना कान ,नाक ,घसा, डोळे ,बीपी अथवा शुगरचे आजार असतील त्यांना तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा श्रवण यंत्रासाठी किंवा ऑपरेशनसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे यावेळी बाळासाहेब बढे यांनी जाहीर केले. गरजू व्यक्तींनी किंवा नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.