आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

मनोहर पटाडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

वडगाव (कांदळी), भोरवाडी चे एक आदर्श व्यक्तीमत्व, आदर्श शिक्षक मनोहर पटाडे सर यांचा अभिष्ठचिंतन सोहळा क्रांतिवीर मित्र मंडळ, भोरवाडी व निर्मलग्राम वडगाव (कांदळी) ग्रामस्थांच्या वतीने अतिशय आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना पंचायत समिती सदस्या माधुरी निलख, विघ्नहर सह. सा. कारखाना संचालक संजय खेडकर, माजी सरपंच रामदासशेठ पवार, साईलक्ष्मी पतसंस्था चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते सर, बिरोबा महाराज पतसंस्था चेअरमन सचिन निलख, सामाजिक कार्यकर्ते सागर दहितुले, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते यांनी पटाडे सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा देत सरांच्या जिल्हाभर असलेल्या मित्र परिवाराचे विशेष कौतुक करत समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकीतून सरांच्या समाज कार्याचा जीवनपट उलगडून दाखवला; इंग्रजी विषयात पारंगत असलेल्या सरांमुळे अनेक विद्यार्थी कसे घडले याची प्रशंसा उपस्थितांनी केली.
आदर्श मंडळ पुरस्कार प्राप्त क्रांतिवीर मित्र मंडळाच्या यशात पटाडे सरांचा सक्रीय सहभाग आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातून मंडळाला आदर्श मंडळ पुरस्कार मिळवून देण्यात सरांचा सिंहाचा कसा वाटा आहे हे मंडळाचे अध्यक्ष महेश भोर व उपाध्यक्ष कृष्णा भोर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.


मंडळाच्या वतीने पटाडे सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्रीराम पतसंस्था व्यवस्थापक राहुल भोर, सामाजिक कार्यकर्ते भास्करशेठ भोर, हॉटेल रेश्मा चे हसनशेठ तांबोळी, प्रगतशील शेतकरी शिवाजी बापू भोर, जयसिंग भोर, सुधीर घंगाळे , रब्बानी तांबोळी, गौरव भोर, नितीन पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे