पोपट बढे यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सन्मान
1 min read
वडगाव कांदळी:- नगदवाडी (ता. जुन्नर) येथील नगदवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पोपट बढे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वडगाव कांदळी शाखेत सन्मान करण्यात आला.यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, वसुली अधिकारी संदीप जाधव, बँकेचे वडगाव कांदळी शाखेचे विकास अधिकारी अमित जाधव, व्यवस्थापक शांताराम साबळे ,नवनियुक्त व्यवस्थापक रवींद्र घोगरे, रोखपाल प्रसाद आरेकर, बँकेचे माजी व्यवस्थापक मच्छिंद्र घाडगे,जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे, वडगाव सोसायटीचे माजी चेअरमन जनार्दन (मामावडे) भोर ,सामाजिक कार्यकर्ते महेश बढे,ज्ञानेश्वर बढे ,वडगाव कांदळी सोसायटीचे सचिव राहुल खरमाळे, नगदवाडी सोसायटीचे सचिव अमोल गुंजाळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे म्हणाले की, नगदवाडी सोसायटी चेअरमनपदी पोपट बढे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीबद्दल बँकेचे संचालक ॲड .संजय काळे साहेब यांनी त्यांचे अभिनंदन व सन्मान या अगोदरच केला आहे.

पुणे जिल्हा बँकेच्या वतीने त्यांनी या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच सोसायटीला कर्ज प्रकरणे, कर्ज वसुली याबाबत सर्वतोपरी मदत केली जाईल असे सुभाष कवडे यांनी आश्वासित केले. यावेळी वडगाव कांदळी शाखेचे व्यवस्थापक शांताराम साबळे यांची बदली झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच वडगाव कांदळी शाखेचे नवनियुक्त व्यवस्थापक रवींद्र घोगरे यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे यांनी सोसायटीने बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.