आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

श्री कुलस्वामी ट्रस्ट वडज ला अशोक बढे कुटुंबियांकडून ५१हजार देणगी

1 min read

वडगाव कांदळी :- श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट वडज (ता. जुन्नर, जि. पुणे) या ट्रस्टला मंदिर नूतनीकरणासाठी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक तुळशीराम बढे कुटुंबियांकडून ५१ हजार रुपये संस्थेचे कार्याध्यक्ष विजय बबन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, कांदळी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिलबापू भोर ,सामाजिक कार्यकर्ते तान्हाजीशेठ बढे, महेश बढे ,दयानंद बढे, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे उपस्थित होते .यावेळी वडज देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष विजय चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचा सन्मान केला .


खंडेराया वरील भक्ती, विश्वास आणि आपली मनोकामना पूर्ण होत असल्याने गेली चार वर्ष पासून नियमितपणे दर रविवारी वडज येथे आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून अशोक बढे हे दर्शनासाठी कुलस्वामी खंडेरायाला जात असतात. मनातली इच्छा मनोकामना तसेच कोणतेही काम करण्याची जिद्द ,प्रेरणा व उत्साह खंडेरायाच्या दर्शनाने मिळत असतो अशी भावना यावेळी अशोक बढे यांनी व्यक्त केली. या भावनेतूनच दरवर्षी ते खंडेरायासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात याही वर्षी अशोक बढे कुटुंबियांकडून धार्मिक कार्यासाठी ५१हजार रुपयांची देणगी ट्रस्टकडे सुपूर्द केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे