आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

महिला दिनानिमित्त कांदळीत नारी शक्तीचा सन्मान

1 min read

वडगाव कांदळी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कांदळी (ता. जुन्नर) येथे महिलांना हळदीकुंकू व सन्मान सोहळा कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या निवासस्थानी ,एचपी पेट्रोल पंपासमोर लिंबामाथा, कांदळी येथे रविवारी (दि.८) पार पडला यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ३८५महिलांची उपस्थिती होती. अभय वारुळे यांच्या न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात १३० महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात प्रथम क्रमांक ची सोन्याची नथ व पैठणीचा मान सारिका प्रणित बढे या महिलेने पटकाविला .द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कुलर व पैठणी शुभांगी आशिष घाडगे यांनी मिळवले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिक्सर व पैठणी अर्चना सुभाष शेंडे यांना मिळाले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस कुकर व पैठणी सीमा संतोष घाडगे यांना मिळाले तर पाचव्या क्रमांकासाठी असणारे डिनर सेट व पैठणी अरुंधती महेंद्र बढे यांना मिळाले यामध्ये चंद्रभागा मुक्ता बढे व सुंदराबाई गणपत काळे यांनी सहभाग घेतला .उपस्थित महिलांमधून ११ भाग्यवान महिलांना निर्मला बढे ,सुनीता बढे ,उन्नती बढे, ऋतुजा बढे, वनिता बढे ,अनिता बढे यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली .महिलांचा केलेला सन्मान व खेळ पैठणीचा या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त सदस्य कल्पना वैभव काळे ,जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, उद्योजक संदीप बढे,जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मंगेशअण्णा काकडे ,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे , तान्हाजी बढे, कांदळीचे माजी उपसरपंच नारायण भोर ,सुदर्शन बढे, अनिल भोर , ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे ,महेश बढे, विश्वास बढे, योगेश बढे, दिनेश कुतळ,शिवशंकर मांडे, दयानंद बढे, अक्षय बढे ,प्रसाद घाडगे, शुभम बढे, दिनेश बढे, गणेश भोर, संतोष बढे , महेश बढे, नवनाथ नेंद्रे,अशोक जगताप, सोमनाथ कुतळ , संपत बढे, संकेत बढे,यश बढे,तेजस बढे ,विघ्नेश बढे, स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.जागतिक महिला दिनानिमित्त बाळासाहेब बढे यांनी महिलांचा सन्मान केल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. युवा उद्योजक सौरभ बढे ,सिद्धेश बढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे