आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडीत बैलगाडा शर्यतींना उस्फूर्त प्रतिसाद 

1 min read

उज्वल बढे यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा 

वडगाव कांदळी :- हनुमान जन्मोत्सव व श्री कुलस्वामी खंडेराया यात्रोत्सवानिमित्त नगदवाडीत बैलगाडा शर्यतीचे. आयोजन करण्यात आले होते यावेळी १२०बैलगाडा मालकांनी शर्यतीत सहभाग घेतला. उज्वल मंगेश बढे यांच्या बैलगाड्याने घाटाचा राजा होण्याचा बहुमान मिळविला. प्रथम क्रमांकात५० बैलगाडे धावले .कांदळीचे माजीआदर्श सरपंच संतोष बढे व उद्योजक संदीप बढे यांच्या वतीने ६१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले .द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे बक्षीस कांदळी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी बढे , नगदवाडी सोसायटीचे चेअरमन पोपट बढे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,वडगाव कांदळी चे माजी सरपंच रामदास पवार, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते ,उद्योजक संदीप बढे ,गुरुप्रसाद पापडचे गणेश दुरगुडे, युवा नेते नवनाथ नेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, रघुनाथ बढे,गुलाब बढे यांच्या वतीने देण्यात आले यात २२ बैलगाडे धावले तर तृतीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्षीस जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे व अनिरुद्ध रियल इस्टेट चे योगेश बढे यांच्या वतीने देण्यात आले .

प्रथम क्रमांक फायनल साठी ४१ हजार रुपयांचे बक्षीस बिरोबा पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख, युवा उद्योजक बाबाजी काळे, आरती एंटरप्राइजेस चे अभिषेक मुटके यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे फायनलचे बक्षीस ३१ हजार रुपये नगदवाडी सोसायटीचे संचालक सिद्धार्थ बढे, विश्वास बढे,कॉन्ट्रॅक्टर अभिजीत बढे ,युवा नेते विशाल गुंजाळ, विशाल कुतळ यांच्या वतीने देण्यात आले .तृतीय क्रमांक फायनलचे २१हजार रुपयांचे बक्षीस कांदळी ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी व विलास बबन बढे उद्योजक लहू बढे, बढे वॉटर सप्लायर चे महेश व गणेश देवराम बढे यांच्या वतीने देण्यात आले .फायनल क्रमांक चार चे ११हजार रुपयांचे बक्षीस शिवशंभू बैलगाडा संघटना, युवा नेते करण कुतळ ,प्रसाद कुतळ यांच्या वतीने देण्यात आले फायनल क्रमांक पाच चे ७ हजार ७७७ रुपयाचे बक्षीस यात्रा कमिटी अध्यक्ष सोमनाथ कुतळ यांच्या वतीने देण्यात आले .वीस फुटावरून कांडे ५ हजार५५५ रुपयाचे बक्षीस शौर्य इंटेरियरचे प्रसाद घाडगे, मोरया फेब्रिकेशनचे शुभम बढे ,सुयोग क्लॉथ सेंटरचे उज्वल बढे यांच्या वतीने देण्यात आले .प्रथम क्रमांक फळीफोड साठी ५ हजार रुपयांचे बक्षीस हॉटेल निवांत चे सतीश लेंडे यांच्यावतीने देण्यात आले. द्वितीय क्रमांक फळीफोड साठी ४हजार रुपयांचे बक्षीस यात्रा कमिटी उपाध्यक्ष संकेत बढे यांच्या वतीने देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे बक्षीस प्रगतिशील शेतकरी सचिन बाळासाहेब बढे यांच्या वतीने देण्यात आले.

घाटाचा राजा व फळीफोड एक ते तीन क्रमांकासाठी ट्रॉफी नगदवाडी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकर कुतळ ,संचालक शिवशंकर मांडे कांदळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुरेश बढे यांच्या वतीने देण्यात आले. घाटामध्ये घड्याळ सौजन्य युवा नेते तेजस बढे,पाणी बॉटल सौजन्य अनंत पतसंस्थेचे संचालक रवींद्र बढे व सुप्रसिद्ध निवेदक अक्षय बढे यांच्या वतीने देण्यात आले .घाटात तोरण सौजन्य बंटीशेठ नायडू, घाटात पाणी टँकर सौजन्य युवा नेते महेश बढे व प्रसिद्ध बैलगाडा मालक दयानंद सदाशिव बढे यांच्या वतीने देण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ कुतळ ,उपाध्यक्ष संकेत बढे ,खजिनदार डॉ. अतुल शेंडे यांनी दिली .

हनुमान जन्मोत्सव कुलस्वामी यात्रोत्सानिमित्त हनुमान जन्मोत्सव ,काल्याचे किर्तन,काठी पालखी मिरवणूक ,काल्याचा महाप्रसाद बैलगाडा शर्यती व मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. कुलस्वामी खंडेराया वर्धापन दिनानिमित्त बाळू बढे व मानू मुक्ता शेंडे यांच्या जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला वर्धापन दिनानिमित्त महाप्रसाद सौजन्य स्वाभिमान केटरर्स संपत बाळू बढे यांच्या वतीने देण्यात आले .

या यात्रा उत्सवात घाटाचा राजा होण्याचा मान उज्वल मंगेश बढे व विजय अण्णासाहेब पाचपुते यांनी मिळवला .प्रथम क्रमांक फायनलचे बक्षीस उज्वल मंगेश बढे ,मंगेश मुळे व प्रकाश भोर यांनी पटकाविले. दोन नंबर फायनलचे बक्षीस सुदर्शन अशोक बढे व ज्ञानेश्वर चव्हाण, प्रशांत डोंगरे व पप्पू सरवदे यांनी मिळवले तर तृतीय क्रमांकाचे फायनलचे बक्षीस विक्रम शेंडे व पप्पूदादा मित्र मंडळ, बाबाजी कोकणे व अरुण मुळे यांनी मिळविले. चतुर्थ क्रमांकाचे फायनलचे बक्षीस अशोक तुळशीराम बढे व आर के ग्रुप, बबन शिवराम वंडेकर व सिताराम कानडे यांनी मिळविले. पाचव्या क्रमांकाचे फायनलचे बक्षीस आदर्श मनोज चव्हाण व प्रकाश बबन काकडे यांना मिळाले. प्रथम क्रमांकासाठी फळीफोड गणपत कुतळ व योगेश बढे यांना मिळाले द्वितीय क्रमांकाचे फळीफोडचे बक्षीस परीक्षित लांडगे व आराध्य पाचपुते यांना मिळाले. तृतीय क्रमांकाचे फळीफोड बक्षीस मित्र प्रेम बैलगाडा संघटना यांना मिळाले. घाटात आकर्षक बारीचा मान शुभम संतोष बारवे यांनी मिळविला तर वीस फुटावरील कांड्याचे बक्षीस विक्रम बाळासाहेब शेंडे यांना मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे