आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

वडगाव कांदळीत वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

1 min read

वडगाव कांदळी:- आदर्श निर्मलग्राम वडगाव (कांदळी) येथे ग्रामस्थांच्या वतीने एक पाऊल निसर्गाकडे या मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून वृक्षारोपण मोहीम २०२६ चार टप्प्यात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे या मोहिमेआंतर्गत गावठाण आणि परिसरात, मळ्यातील रस्त्याच्या दुतर्फा जवळपास दोन हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज दि. १९ रोजी जुन्नर चे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चे शास्रज्ञ डॉ. राहुल घाडगे, जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई काळे, पंचायत समिती सदस्या माधुरी निलख, सरपंच उल्का पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर तसेच गावातील विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य, हिंदमाता विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे यांनी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ तसेच वयक्तिक सौजन्याने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि लावण्यात येणाऱ्या झाडांचे व्यवस्थित संगोपन करण्यात यावे असे आव्हान केले. प्रमुख वक्ते म्हणून शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे व कृषी केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. राहुल घाडगे यांनी बोलताना वृक्ष लावगड चे महत्त्व विशद करून त्या झाडांचे संगोपन कशा पद्धतीने करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले, झाडांमुळे मिळणाऱ्या अनेक फायद्यांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. शैलजा पाचपुते यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत पाचपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. मारुती पाचपुते यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे