कांदळीत नारीशक्तीचा सन्मान
1 min read
वडगाव कांदळी :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कांदळी (ता. जुन्नर) येथे महिलांचा हळदीकुंकू व सन्मान सोहळा कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या निवासस्थानी एच पी पेट्रोल पंपासमोर लिंबामाथा, कांदळी या ठिकाणी रविवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे .यानिमित्त न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमांतर्गत प्रथम क्रमांकासाठी सोन्याची नथ व पैठणी द्वितीय क्रमांक साठी कुलर व पैठणी तृतीय क्रमांकासाठी मिक्सर व पैठणी चतुर्थ क्रमांक साठी कुकर व पैठणी पाचव्या क्रमांकासाठी डिनर सेट व पैठणी तसेच लकी ड्रॉप पद्धतीने पाच महिलांना पैठणी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.