आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

पांडुरंगशेठ काळे ठरले आमदार केसरी २०२५ चे मानकरी

1 min read

वडगाव कांदळी:-निसर्गरम्य हिंदकेसरी बैलगाडा घाट पिंपरी पेंढार (ता.जुन्नर )येथे जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार केसरी २०२५चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी १ लाख २५हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी१ लाख रुपये, क्रमांकासाठी ५०हजार तसेच फायनल मध्ये प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर ,द्वितीय क्रमांक फायनल साठी बुलेट, तृतीय क्रमांक फायनल ते फायनल क्रमांक२५पर्यंत प्रत्येकी मोटरसायकल बक्षीस देण्यात आल्या. या बैलगाडा शर्यतीचे आयोजन माजी आमदार अतुल बेनके युवा मंच जुन्नर तालुका, उपसरपंच अमोलशेठ नामदेव वंडेकर मित्रपरिवार व समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार यांच्या वतीने करण्यात आले होते. तीन दिवसात सर्वात आतून येणारी बारी म्हणजे घाटाचा महाराजा (चांदीच्या गदेचा मानकरी) होण्याचा मान पंकजशेठ घेवडे ,रिद्धेशदादा बांगर, थोरात भक्ते जुगलबंदी यांनी मिळविला. तर आमदार केसरी पिंपरी पेंढार २०२५ चा किताब पांडुरंगशेठ किसन काळे ,स्वराज भरत शिवले यांनी पटकाविला .

यावेळी जुन्नरचे माजी आमदार अतुलशेठ बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, ॲड. विजय कुऱ्हाडे, पिंपरी पेंढार गावच्या सरपंच सुरेखाताई वेठेकर ,भाजपा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, माजी उपसरपंच किसनराव कुटे, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, बबनशेठ दांगट ,वडगाव कांदळी चे माजी सरपंच रामदास पवार ,साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत पाचपुते, वडगाव कांदळी चे माजी उपसरपंच शरद पाचपुते ,रोहिदास वेठेकर, मधुकर वेठेकर, भाऊसाहेब पिंगळे, रामदासशेठ विधाटे, युवा उद्योजक आनंदशेठ वंडेकर, सोमनाथ डोके ,महेश कुटे, ऋषी नवले, बाबू कुटे, शेख सर ,जाधव सर ,उल्हास कुटे, दत्ता गाजरे ,सतीश गुंजाळ, बिपीन मिंढे उपस्थित होते. यात्रा कमिटी व अमोलशेठ वंडेकर मित्रपरिवार यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

निवेदक म्हणून साहेबराव आढळराव ,मधुअण्णा जाधव, माऊली पिंगळे, लक्ष्मण बांगर, ऋषी देवाडे, बाळासाहेब टेमगिरे यांनी काम पाहिले या स्पर्धेत ६०० बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे