आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

येडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय काशिद बिनविरोध

वडगाव कांदळी: येडगाव (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय शंकर काशिद यांची तर उपाध्यक्षपदी सुनीता एकनाथ भोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबतची माहिती संस्थेचे मार्गदर्शक व संचालक गुलाबराव नेहरकर यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी निलेश धोंगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल गावडे, माजी उपाध्यक्ष सविता भिसे, संचालक नामदेव नेहरकर, संतोष नेहरकर, शिवाजी नेहरकर, मुरलीधर भोर, दिनेश जोरे, विवेक गावडे, श्रीपाल खरात, अशोक गावडे ,ज्ञानेश्वर भिसे,संतोष भोर,भाऊ शेलार,उज्वला भिसे,निलेश काशिद,सुरेश नेहरकर,वैभव नेहरकर,राजेंद्र भोर ,गोरक्ष काशिद,अशोक भोर, प्रकाशशेठ नेहरकर, दयानंद काशिद मच्छिंद्र काशिद ,आकाश गावडे ,अमोल गावडे आदी सभासद उपस्थित होते.

निवडणुकीचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा गुलाबराव नेहरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभासदांना कर्ज नोंदणी, शेती पीक कर्ज, पशुसंवर्धन, घरकुल कर्ज, प्रशिक्षण आदी सुविधा एकाच
ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सोसायटीच्या माध्यमातून सहकार भवन उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती यावेळी संस्थेचे मार्गदर्शक गुलाब नेहेरकर यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे