आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शिवचिदंबर मंदिरात कल्याणोत्सव सोहळा

1 min read

वडगाव कांदळी :- भगवान शिवअवतार शिवचिदंबर महास्वामी कल्याणोस्तव शुभविवाह सोहळा बुधवारी (दि२६)रोजी चंपाषष्टी पर्वावर दुपारी बारा वाजता शिवचिदंबर महास्वामी देवस्थान, चिदंबरनगर, मोकसबाग, कांदळी (ता. जुन्नर )येथे संपन्न होणार आहे.शुक्रवार दि२१ ते मंगळवार दि.२५ या कालावधीत तुकोबांची जीवनगाथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.

या ज्ञानयज्ञाचे कथा प्रवक्ते ह. भ .प .श्रीकांत महाराज दुराफे ,आळंदी हे असणार आहेत. कथेची वेळ दररोज सायंकाळी सहा ते नऊ व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवचिदंबर सेवा समिती मोकसबाग ,कांदळी यांच्या वतीने देण्यात आली आहे. या कालावधीत मंगळवार दिनांक २५ रोजी दुपारी तीन वाजता हळदी समारंभ, चार वाजता होणार सिमंतीपूजन बुधवार दिनांक २६ रोजी सकाळी आठ वाजलेपासून मांडव डहाळे, गोंधळ, रुखवत, मिरवणूक व कल्याणोत्सव शुभ विवाह सोहळा संपन्न होणार आहे. परिसरातील भाविकांनी या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन शिव चिदंबर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे