आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

प्रकाश नेहरकर कृषीथॉन २०२५ पुरस्काराने सन्मानित

1 min read

वडगाव कांदळी:- येडगाव (ता.जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश दादाभाऊ नेहरकर यांना नाशिक येथे आयोजित कृषीस्थान मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

द्राक्षे व कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून नाशिक येथे आयोजित कृषीथॉन २०२५ या भव्य कार्यक्रमात प्रकाश नेहरकर व बंधू यांना कृषीथॉन २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये त्यांच्या दीर्घकालीन मेहनतीची, नाविन्यपूर्ण शेती पद्धतींच्या अवलंबाची आणि दर्जेदार द्राक्ष उत्पादनातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल म्हणून मिळालेला हा सन्मान अत्यंत मोलाचा व अभिमानाचा आहे. यावेळी येडगाव सोसायटीचे माजी चेअरमन संतोषशेठ नेहरकर , गंगाशेठ भोर, हिराताई शेटे, मच्छिंद्र नेहरकर व सर्व नेहरकर कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते.

नेहरकर बंधूनी नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध शेती, पाण्याचे संवर्धन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन यांना प्राधान्य दिले. मेहनत, चिकाटी, पिकविविधता आणि अनुभव याद्वारे त्यांनी शेतीत मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.

कृषीथॉनसारख्या राज्यस्तरीय व्यासपीठावर त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे