नगदवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी पोपट बढे बिनविरोध
1 min read
वडगाव कांदळी:- नगदवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पोपट केरभाऊ बढे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश धोंगडे यांनी दिली.

जुन्नरचे सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेश धोंगडे यांनी काम पाहिले .ही निवडणूक कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी व्हॉईस चेअरमन दिनकर कुतळ, माजी चेअरमन सुरेश बढे,संचालक शिवशंकर मांडे ,विश्वास बढे, सिद्धार्थ बढे, गणेश भोर, देवराम थोरात, गुलाब कुतळ, संगीता बढे ,अलका भोर,सचिव अमोल गुंजाळ, मदतनीस दत्तात्रय थोरात उपस्थित होते .यावेळी कांदळी गावचे माजी सरपंच बाळासाहेब बढे यांनी कांदळी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन पोपट बढे यांचा सन्मान केला.