आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडीत शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न

1 min read

१५१ शिवभक्तांनी केले रक्तदान

वडगाव कांदळी :- युवा स्वराज्य प्रतिष्ठान नगदवाडी ,कांदळी यांच्या वतीने तिथीनुसार भव्य शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य निदान तपासणी करण्यात आली. शुक्रवारी (दि.६ ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगदवाडी कांदळी (ता.जुन्नर) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शिवनेरी ब्लड सेंटर, मंचर व युवा स्वराज्य प्रतिष्ठान नगदवाडी, कांदळी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

सायंकाळी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगदवाडी व न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शिवव्याख्याती प्रबोधनकार अर्चनाताई भोर – करंडे यांचे स्वराज्य स्थापना विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला, तरुण व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सर्वांसाठी महाशिव भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवभक्तांनी, ग्रामस्थांनी शिवजयंती सोहळा , रक्तदान शिबिर, व्याख्यान व आरोग्य निदान तपासणी शिबीरात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. युवा स्वराज्य प्रतिष्ठान नगदवाडी, कांदळी यांच्या उत्कृष्ट नियोजन, युवकांचे संघटन, समाज उपयोगी उपक्रमात सहभाग यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवजन्मोत्सव कार्यक्रमात मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती, ग्रामस्थांचे युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे