अंतराळ संशोधन केंद्राच्या भेटीसाठी निवड झालेल्या कृष्णाचा सन्मान
1 min readवडगाव कांदळी :- इस्रोअंतराळ संशोधन केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या तीन निवड चाचणीनंतर जिल्हा परिषद शिरोली( बोरी) शाळेतील इयत्ता सहावी मधील गुणवंत विद्यार्थी कु .कृष्णा तुषार डावखर या विद्यार्थ्यांची आय एस आर ओ अंतराळ शोधन केंद्र भेटीसाठी निवड झाली.
त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी धर्मवीर संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाशशेठ नेहरकर, विविध कार्यकारी सोसायटी येडगावचे माजी चेअरमन संतोष नेहरकर व जुन्नर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मंगेश खिलारी यांच्या हस्ते कुमार कृष्णा तुषार खिल्लारी यास सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले