आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

वडगाव कांदळीतून मराठा आंदोलकांसाठी मुस्लिम समाजाचा मदतीचा हात

1 min read

वडगाव कांदळी (पोपट बढे):- मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साथ देणाऱ्या हजारो मराठा आंदोलक समाज बांधवांसाठी भाकरी, चपाती, चटणी, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे, फरसाण ,भेळ व इतर खाद्यपदार्थ घेऊन वडगाव कांदळी येथील ग्रामस्थ सोमवारी( ता.१) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यामध्ये १हजार ५००लोकांची जेवणाची व्यवस्था होईल एवढे साहित्य दानशूर व्यक्ती ग्रामस्थ यांच्या मदतीने व सहकार्याने गोळा करून आंदोलकांसाठी पाठवण्यात आले. मुस्लिम समाजानेही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केले यात आंदोलकांना पिण्यासाठी पन्नास पाणी बॉक्स कै. कादर खतीब पठाण यांच्या स्मरणार्थ बबलू शेठ पठाण मित्रपरिवार यांच्याकडून देण्यात आले. बाबाजी लांडगे, मच्छिंद्र पाचपुते, उस्मान पठाण इनामदार ,मधुशेठ पाचपुते, राजेंद्र पाचपुते ,हसनभाई तांबोळी, पोपट फुलसुंदर, चंद्रकांत फुलसुंदर ,जयसिंग भोर ,रब्बानी तांबोळी, वडगाव कांदळी च्या सरपंच उल्काताई पाचपुते ,उपसरपंच संजय खेडकर,श्री संजय खेडकर मुस्लिम सदर, शहाबुद्दीन इनामदार,सेक्रेटरी उस्मान पठाण, इरफान पठाण , फरीद इनामदार ,सिद्दीक इनामदार , जुबेर इनामदार ,खुशमोहम्मद इनामदार ,आसिफ इनामदार , अकील इनामदार ,अशपाक इनामदार ,अनिस इनामदार , निसार पठाण ,तन्वीर पठाण, गौरव पाचपुते ,मंगेश पाचपुते ,मयूर पाचपुते , यांच्यासह आंदोलकांना मदत करणारे करणारे वडगाव कांदळी चे ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी मुंबई येथे सुरू असणाऱ्या मराठा आंदोलकांना जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी परिसरातून भाकरी, चपाती, चटणी व खाद्यपदार्थ गोळा करून पाठवण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत वडगाव कांदळी,भोरवाडी ग्रामस्थांनी दीड हजार लोकांची जेवणाची व्यवस्था होईल एवढे पदार्थ गोळा करून पाठवून दिले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार , वडगाव कांदळीच्या सरपंच उल्काताई पाचपुते , माजी सरपंच रामदासशेठ पवार, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते , उद्योजक सावळेरामशेठ भोर,दत्तूशेठ भोर , भास्कर भोर,वसंत भोर,देविदास (नटराज) भोर, अमित उर्फ बंटी भोर, महेश भोर ,कैलास भोर ,भाऊशेठ पाचपुते,अंकिता भोर ,प्रसाद पवार, नवनाथ थोरात, संदिप निलख, बाजीराव भोर ,तुकाराम बाळा भोर, बाबाजी भोर ,गुलाब भोर , अंबादास भोर ,उमाजी भोर, सुखदेव मुटके , संतोष भोर, रामदास भोर, गोरक्ष मुटके,सुनील मुटके, आकाश मुटके, धोंडिभाऊ मुटके, सुरेश तिकोने,रब्बानी तांबोळी ,महेंद्र सोनवणे, राहुल भोर, दादाभाऊ भोर, संपत भोर, कृष्णा भोर ,आनंद पवार,रामदास भोर ,संतोष भोर, अनंत पवार ,दत्तु बापु पवार, बबन पाचपुते, धनेश भोर,महेश प्रभाकर भोर, सिद्धेश सावंत , विठ्ठल सोनवणे,मच्छिन्द्र महादू भोर,नवनाथ कोंडाजी भोर, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे