नाना पेठेत दोन टोळी भिडल्या; एकाचा मृत्यू, आंदेकर टोळीतील 6 जणांना बेड्या
1 min readपुणे:- पुण्यात गुन्हेगारांच्या टोळींचा धुमाकूळ सुरु आहे. त्यातच नाना पेठेत काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीतील राईतांनी दोघांवर शस्त्राने वार केले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. त्याच आंदोकर टोळीतील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर, कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय 33), तुषार निलंजय वाडेकर (वय 24), स्वराज निलंजय वाडेकर (वय 20), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळ्यांविरोधात हल्ल्यात जखमी झालेल्या 29 वर्षीय निखिल आखाडे गंभीर झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय 27 ) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना 7 आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोयता गँग आणि टोळ्यांची दहशत कायम…
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग आणि पुण्यातील टोळ्या दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयगा गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे.