आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडी केंद्रशाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

1 min read

नगदवाडी केंद्रशाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

वडगाव कांदळी :- नगदवाडी(ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षक वृंदांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.अशी माहिती केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली.

शिक्षक सत्कार सोहळ्यात नगदवाडी गावात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे अखंड काम करत विद्यार्थी घडविणाऱ्या,विद्यार्थ्यांवर उत्कृष्ट संस्कार करणाऱ्या,विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंदांचा शाल,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडी,शाळा सल्लागार समिती नगदवाडी,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,सखी सावित्री समिती,विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती,महिला तक्रार निवारण समिती व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बढे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तान्हाजी बढे,दिपाली जाधव,अक्षदा जाधव,दिनेश कुतळ, विश्वास बढे,रविन्द्र काळे,संतोष बढे,अभिजित बढे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी मुख्याध्यापक सखाराम शेंडकर,दिपक घाडगे,शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर,उज्वला कांबळे,दिलीप तोतरे,राजेश जाधव,संकल्प चासकर,संगिता गाडेकर या शिक्षक वृंदांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडी,शाळा सल्लागार समिती नगदवाडी,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ, सखी सावित्री समिती,विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती,महिला तक्रार निवारण समिती यांच्या वतीने करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे