आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

क्रांतिवीर महिला ग्रुप, भोरवाडी श्रावण सखी पुरस्काराने सन्मानीत

1 min read

वडगाव कांदळी (पोपट बढे):- रणरागिणी ग्रुप, पिंपरी चिंचवड च्या वतीने आयोजित २०२५ साठीचा विशेष “मानाचा फेटा पुरस्कार” कु. क्षितिजा भोर आणि “श्रावण सखी पुरस्कार” ग्रामीण विभागातून क्रांतिवीर महिला ग्रुप, भोरवाडी, वडगाव (कांदळी), ता.जुन्नर, जि. पुणे या महिला ग्रुपला चिंचवडच्या मा. आमदार श्रीमती अश्विनी जगताप व सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप यांच्या शुभहस्ते स्थानिक पातळीवर महिलांना प्रोत्साहनपर उपक्रम राबवून तसेच महिलांना पारंपरिक चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पाडून कु. क्षितिजा भोर हिच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली मंगळागौर सारखे शहरी महिलांना नवपरिचित असलेले ग्रामीणभागातील पारंपरिक कार्यक्रम घेवून अनेक महिलांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यातून अनेक महिला आत्मनिर्भर झालेल्या दिसून येत आहे या कार्याबद्दल “श्रावण सखी पुरस्कार” सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

या वेळी पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक महिला भगिनींनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले; विशेषतः शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यातील क्रांतिवीर महिला ग्रुप च्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली

निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव,सांगवी या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंचवड चे आमदार श्री. शंकर जगताप, नगरसेवक अमरसिंग आदियाल आदि मान्यवर उपस्थित होते; कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ. मोनिका जाधव आणि शकिना पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामभाऊ वाळुंज तर आभार विकास जामभूळकर केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे