बिरोबा पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
1 min read
दिवाळी भेटवस्तू सह सभासदांना मिळणार १४ टक्के लाभांश
वडगाव कांदळी:- श्री बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वडगाव कांदळी (ता. जुन्नर )या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सचिन निलख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी व्हा. चेअरमन देवीदास भोर, संचालक ज्ञानेश्वर थोरात, विश्वनाथ पवार, चंद्रकांत पाचपुते, पंढरीनाथ पाचपुते, संतोष लांडगे, डॉ. निजाम पठाण, ॲड.राहुल फुलसुंदर, अविनाश पवार, रवींद्र रोकडे, संचालिका अंजना नरवडे, मनीषा सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार मुटके, संगणक ऑपरेटर अजित रोकडे, अंतर्गत हिशोब तपासणीस बबन भालेराव, मदतनीस रमेश पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व वडगाव कांदळीचे उपसरपंच संजय खेडकर, निवृत्त आदर्श मुख्याध्यापक भास्कर पाचपुते, पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते, माजी आदर्श सरपंच ज्ञानेश्वर निलख, बिरोबा महाराज दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शाबुद्दीन इनामदार, लोकनेते पतसंस्थेचे संचालक संतोष काळे, मच्छिंद्र काळे, भास्कर पाचपुते, चंद्रकांत नरवडे, महेंद्र सोनवणे कांदळी गावचे खंडू गुंजाळ उपस्थित होते.

यावेळी सभासद डॉ. सत्यवान थोरात यांनी अनेक मार्गदर्शनपर सूचना केल्या. गोरक्ष मुटके, बाबाजी लांडगे, संदीप निलख, पोपट निलख, रंगनाथ पाचपुते या सर्व सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेत सहभाग घेतला.
संस्थेचे कार्यक्षेत्र जुन्नर तालुका करावे, सभासदांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, संस्थेची वसुली वाढवावी अशा प्रकारच्या अनेक सूचना सभासदांनी केल्या. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या सभासदांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
चौतीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बिरोबा महाराज पतसंस्थेमध्ये १४३४ सभासद असून १३कोटी ३१ लाखाच्या ठेवी आहेत. संस्थेने ४कोटी ७० लाख ९५ हजाराची गुंतवणूक केलेली आहे. स्वनिधी १कोटी ७५ लाखाचा असून संस्था पूर्णपणे स्थिर स्थावर आहे. संस्थेने कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही. संस्थेला या आर्थिक वर्षात ३५ लाखांचा निव्वळ नफा झालेला आहे. दरवर्षी संस्था १४ टक्के लाभांश आणि दिवाळी भेटवस्तू देते, अशी माहिती चेअरमन सचिन निलख यांनी दिली.
संस्थेतर्फे सभासदांना आरटीजीएस, एनइएफटी, गृहतारण कर्ज, वाहनतारण कर्ज, जामीनकी कर्ज या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. मोबाईल बँकिंग आणि एसएमएस सुविधाचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात असून थोड्याच अवधीत या सुविधा सभासदांना उपलब्ध केल्या जातील.
सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे व्हाईस चेअरमन देविदास भोर यांनी केले तर अहवाल वाचन अंतर्गत हिशोब तपासणीस बबन भालेराव यांनी केले. आभार संचालक ॲड.राहुल फुलसुंदर यांनी मानले.