आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू दोन धनगर गंभीर जखमी

1 min read

वडगाव कांदळी (पोपट बढे):- वडगाव कांदळी (ता. जुन्नर)हद्दीतील भुजबळ वस्ती येथे शुक्रवारी (दि.२२) रात्री साडेबाराच्या सुमारास सावळेराम करगळ या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात वडील व मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री १२.३० च्या सुमानास बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला केल्यानंतर ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली त्याने आरडा ओरड केला व मेंढ्यांच्या दिशेने धावला असता बिबट्याने मुलावर हल्ला चढविला हे पाहून वडील सावळेराम करगळ त्याला वाचविण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर देखील हल्ला केला त्याचवेळी वाड्यावर असणाऱ्या चार कुत्र्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली व त्यानंतर पळून जात असताना वाड्याभोवती लावलेल्या सहा फूट उंचीच्या तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला व चार कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला चढविला त्यात चार ते पाच वय वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला असून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट्याचे पोस्टमार्टम करण्यात आले असून वनविभागाच्या वतीने वडील सावळेराम करगळ व मुलगा याला नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती वनरक्षक विशाल गुंड यांनी दिली.
प्रतिक्रिया

“वडगाव कांदळी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असून प्राण्यांवर हल्ले करणे ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. बरेच ठिकाणी माणसांवरही बिबटे हल्ले करत आहेत तरी परिसरात वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.”

*उल्का पाचपुते*
सरपंच ,वडगाव कांदळी ता. जुन्नर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे