बिरोबा महाराज दूध संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
1 min readवडगाव कांदळी( पोपट बढे):- वडगाव कांदळी( ता. जुन्नर) येथील बिरोबा महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन संदेश गणपत पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक प्रकाश थोरात, विनोद पवार, प्रवीण लांडगे, गणपतशेठ कडूसकर, कैलास थोरात ,शांता पवार, इंदुबाई निलख,जयकुमार पाचपुते, मंगल पाचपुते, मच्छिंद्र पाचपुते, ज्ञानेश्वर पवार, विनोद लांडगे, सचिव जयसिंग पवार, संकलक नंदकुमार मुटके, पांडुरंग पाचपुते, वंदना पाचपुते, चंद्रकांत पाचपुते यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरोबा महाराज दूध संस्था जुन्नर तालुक्यातील अग्रेसर अशी दूध संस्था असून संस्थेची स्थापना १९८७साली झाली असून संस्थेला स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ मिळत असून संस्थेचे २७५ दूध उत्पादक सभासद असून संस्थेचे आर्थिक वर्ष २०२४- २५ मध्ये १० लाख २हजार ७३३ लिटर संकलन झाले असून संस्थेला १७ लाख ९४ हजार १२२ रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते यांनी दिली.

संस्थेत वर्षभरात जास्तीत जास्त दुधाचा पुरवठा करणाऱ्या सभासदांचा यावेळी सन्मान करण्यात आला .यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी, बिरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख ,साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते ,रामकृष्ण पाचपुते ,ग्रामविकास ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते, वडगाव कांदळीचे माजी सरपंच रामदासशेठ पवार ,माजी उपसरपंच शरद पाचपुते, गोरक्ष मुटके, बिरोबा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन देविदास भोर ,बाबाजी लांडगे पोपट निलख ,दत्तू पवार, संभाजी पवार ,माजी सरपंच ज्ञानेश्वर निलख ,संदीप निलख ,गणेशा पतसंस्थेचे चेअरमन सुनील पवार, डॉ. अभय राक्षे ,रामदास भोर सोसायटीचे व्हाईस चेअरमन जावेद इनामदार, अजित घाडगे, सूर्यकांत पवार ,अशोक कडूसकर, गणेश काळे, समीर पवार, प्रभाकर पाचपुते, रवींद्र पवार, पांडुरंग पाचपुते ,चंद्रकांत पाचपुते, चिमाजी पाचपुते, खंडू निलख ,रंगनाथ पाचपुते, मंगेश पाचपुते, लेखापरीक्षक कैलास तांबडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेमध्ये सभासदांना १० टक्के लाभांश व प्रतिलिटर १ रुपये २० पैसे बोनस जाहीर करण्यात आला. यावेळी सचिन निलख, रामदास पवार ,रामकृष्ण पाचपुते, बाळासाहेब खिलारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अहवाल वाचन संस्थेचे सचिव जयसिंग नानाभाऊ पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत पाचपुते यांनी केले.