ग्रूप ग्रामपंचायत सरपंच श्री.कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून जयेश्वर येथे नवीन पोस्ट ऑफिस चे उद्घाटन
1 min readपालघर, जव्हार (ईश्वर मुकणे) :- हाडे, देवीचापाडा, धुमपाडा, भांगरेपाडा, रामनगर हे गाव जव्हार पासून 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असून त्यांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी जव्हार, शिरोशी, डेंगाचीमेट, येथे जावे लागत असे परंतु पोस्टच्या सर्व सेवा ह्या ग्रामपंचायत कासटवाडी मधील येणाऱ्या 18 गावांना आता एकच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता लागणार नाही. लोकांचा वेळ वाचेल शिवाय जवळ असल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे.कासटवाडी ग्रामपंचायत कडून सरपंच कल्पेश राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. उद्घाटन प्रसंगी कासटवाडी ग्रामपंचायत लोकनियुत्क सरपंच श्री. कल्पेश विनायक राऊत, श्री.रमेश अवताडे सुप्रीदंट पोस्ट पालघर, श्री.हिलिम खान, डाक निरीक्षक जव्हार, श्री.महादू भुशारा, उप डाक निरीक्षक, ग्राम.सदस्य श्री.शंकर इल्हात, श्री.नितीन चौधरी, ग्राम.कर्मचारी श्री.प्रमोद खोटरा, किरण जानजर, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.