नगदवाडीत गणरायाचे जल्लोषात स्वागत
1 min read

वडगाव कांदळी (पोपट बढे):- नगदवाडी (ता. जुन्नर )येथील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ वरची आळी येथे गणरायाचे पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते ,महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. बुधवार दिनांक २७ ऑगस्ट ते शनिवार दिनांक ६ सप्टेंबर या कालावधीत सिद्धिविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे यामध्ये दररोज सायंकाळी आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.


बुधवारी गणेशमूर्तीचे पारंपारिक वाद्याच्या गजरात आगमन झाले. महिलांनी यामध्ये फुगड्या व वाद्याच्या तालावर ठेका धरत गणरायाचे उत्साहपूर्वक वातावरणात स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तान्हाजीशेठ बढे यांच्या हस्ते आरती घेऊन गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. गणेश मूर्तीचे सौजन्य प्रसाद घाडगे यांच्या वतीने देण्यात आले असून महाप्रसाद सौजन्य महिला बचत गट वरची आळी नगदवाडी यांचे होते .तर रात्री श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसादिक भजनी मंडळ वरचीआळी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.


शुक्रवारी दिनांक २८ चमचा लिंबू स्पर्धा व अथर्व बढे, विघ्नेश बढे, प्रज्वल बढे, प्रथमेश बढे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे .गुरुवार दिनांक २९ रोजी संगीत खुर्ची स्पर्धा व दीपक बढे ,अमित बढे, चैतन्य बढे ,मिलिंद बढे यांच्या वतीने महाप्रसाद सौजन्य राहणार आहे. शनिवार दिनांक ३० स्लो सायकल स्पर्धा व आदित्य बढे ,आनंद बढे, सौरभ बढे यांच्या वतीने महाप्रसाद असणार आहे. रविवार दिनांक ३१रोजी श्री सत्यनारायण महापूजा व अनिल सागर प्रस्तुत स्वर अमृत भजनी मंडळ नारायणगाव यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे .तसेच शुभम बढे, विशाल बढे ,विश्वनाथ बढे, सिद्धेश बढे, आशिष बढे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १रोजी रस्सीखेच स्पर्धा व संकेत बढे ,अक्षय बढे ,जयसिंग बढे यांच्यावतीने महाप्रसादाचे सौजन्य राहणार आहे. मंगळवार दिनांक २ रोजी पोते उडी व बिस्किट खाण्याच्या स्पर्धा तसेच ओंकार बढे, शुभम बढे, प्रितेश बढे, रोहित बढे यांच्या वतीने महाप्रसाद राहणार आहे. बुधवार दिनांक ३रोजी जय बजरंग भजनी मंडळ वानेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे .तसेच संपत बढे, निलेश बढे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक४ रोजी मडकी फोड स्पर्धा व तुषार बढे ,सौरभ बढे ,वैभव बढे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ५ रोजी फुगे फोड स्पर्धा व नितीन बढे, सुमित बढे ,अमोल बढे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .शनिवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता श्रींची महाआरती व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या गणेशोत्सवासाठी विक्रम मंडप १४नंबर (विक्रमशेठ भोर ,प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कांदळी) यांच्या वतीने मंडप सौजन्य देण्यात आले आहे तर ट्रॅक्टर सौजन्य पोपट बढे ,दिनेश बढे,संकेत बढे यांचे राहणार आहे. मिरवणूक सजावट लेबर सप्लायर्स बाबू नायडू व हँडवेल सौजन्य श्री स्वामी समर्थ प्रेस बढे मळा (दत्तात्रय बढे)यांचे आहे. परिसरातील भाविकांनी या गणेशोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.