आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

राज्य परिवहन महामंडळाची बस वळणावर उलटली, 70 विद्यार्थी जखमी

1 min read

नंदुरबार:-  राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकुवा आगाराची तळोदा बस स्थानकातून सुटणारी मानव विकास मिशनची वाल्हेरी ते तळोदा बसचा तालुक्यातील भवर गावाजवळ आज बुधवारी सकाळी 6.30 एसटी महामंडळाच्या भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील तब्बल 70 विद्यार्थी जखमी झाले असून, सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकुवा आगाराची तळोदा बस स्थानकातून सुटणारी वाल्हेरी ते तळोदा बस (क्र. एमएच 06 एस 8661) वाल्हेरी येथून विद्यार्थ्यांना घेऊन तळोद्याकडे परतताना भवर गावाजवळ असलेल्या वळणावर बुधवारी सकाळी 6.30 वाजेदरम्यान उलटली. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. सुरुवातीला 30-35 विद्यार्थी जखमी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा 70 वर पोहोचला आहे.

रुग्णालयाबाहेर पालकांची गर्दी

अपघातानंतर पालक आणि नातेवाईकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पालक, नातेवाईक आणि शिक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.

आमदार पाडवी यांनी घेतली जखमींची भेट

अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर आमदार राजेश पाडवी यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे