साळवाडी ठरले सर्वाधिक ऊस गाळप करणारे द्वितीय क्रमांकाचे गाव
1 min readवडगाव कांदळी (पोपट बढे):- भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या कारखान्या मार्फत गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये कारखान्याने जाहीर केलेल्या ऊसपिक स्पर्धेअंतर्गत जुन्नर तालुक्यातून जास्तीत जास्त ऊस गाळपास दिल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकाकरिता साळवाडी (बोरी खुर्द) गावाची निवड झाली असल्याचे पत्र भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी साळवाडी (बोरी खुर्द)चे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व ग्रामस्थांना पत्राद्वारे कळविले होते त्यानुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत साळवाडी (बोरी खुर्द)गावास पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी साळवाडी बोरी खुर्द गावच्या सरपंच कल्पनाताई वैभव काळे ,ग्रामपंचायत सदस्य संभाजीदादा काळे, गोरक्ष शेटे, पुरुषोत्तम शिंदे ,केशव काळे,संदेश शिंदे,संदीप काळे
मनसुखदादा बांगर ,दत्तात्रय शेटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
