नगदवाडीतून मराठा आंदोलकांसाठी मदतीचा हात
1 min readवडगाव कांदळी ( पोपट बढे):- मुंबई येथे झालेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साथ देणाऱ्या हजारो मराठा आंदोलक समाज बांधवांसाठी भाकरी ,चपाती, चटणी, मिरची, लोणचे, सुकी भाजी हे पेपर लावून व्यवस्थित पॅक करून मुंबई येथे नगदवाडी (ता.जुन्नर) ग्रामस्थांनी मराठा समाज बांधवांसाठी पाठवण्यात आली होती. यामध्ये १हजार ६०० लोकांची भोजनाची व्यवस्था होईल एवढे पदार्थ पाठविण्यात आले होते या उपक्रमात नगदवाडी ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींचे खूप सहकार्य लाभले.

यामध्ये कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन सुरेश बढे, व्हाईस चेअरमन दिनकर कुतळ, कांदळी ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे, कृष्णा बढे, नंदा बढे, अनिल बापू भोर, रवी काळे ,विश्वास बढे, सचिन बढे,दिनेश बढे, राजाराम बढे,केशव घाडगे ,सामाजिक कार्यकर्ते तान्हाजीशेठ बढे, महेश बढे, दयानंद बढे ,प्रसाद घाडगे, शुभम बढे,योगेश बढे, निवृत्ती बढे ,अभिजीत बढे, जयसिंग तुकाराम बढे, सोमनाथ कुतळ, सुनील कुतळ, सतीश बढे,अशोक जगताप, रघुनाथ बढे, बाळासाहेब बढे, राम बढे, नितीन कुतळ, विलास बढे, राजू बढे,दिलीप बढे, बाबाजी बढे ,कोंडीभाऊ बढे ,दादाभाऊ बढे,ज्ञानेश्वर बढे, अनंता बढे ,सुधीर बढे, दिगंबर बढे ,संजय बढे या व्यक्तींनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने मराठा समाज बांधवांसाठी आंदोलन करणाऱ्यांना मदत केली होती.
