आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

श्री बालाजी ट्रॅक्टर्स तर्फे शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

1 min read

वडगाव कांदळी (पोपट बढे):- नारायणगाव (ता. जुन्नर )येथे श्री बालाजी ट्रॅक्टर्स तर्फे शेतकरी सन्मान सोहळा, स्वराज ग्राहक मेळावा, नवीन ट्रॅक्टर अनावरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी भव्य लकी ड्रॉ व प्रत्येक शेतकऱ्यास भेटवस्तू देण्यात आली असल्याची माहिती ते बालाजी ट्रॅक्टर चे सर्वेसर्वा संतोष भुजबळ यांनी दिली.

शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकरी नेते स्वर्गीय लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी श्री बालाजी ट्रॅक्टर्स मार्फत शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असतो यावेळी जुन्नर, आंबेगाव, पारनेर ,संगमनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दातखिळेवाडी (ता. जुन्नर) येथील लोकनियुक्त सरपंच राहुल दातखिळे यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांसाठी मार्गदर्शन केले .अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सविस्तर दिली.

याप्रसंगी स्वराज ट्रॅक्टर अँड सेलचे अमित वरुडे, यादव, साहिल जोशी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून स्वराज ट्रॅक्टर बद्दल माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर विषयी विविध समस्यांना साहिल जोशी यांनी समाधानकारक उत्तरे देऊन स्वराज ट्रॅक्टर चे इंजिन, कार्यक्षमता, मायलेज याविषयी माहिती दिली. यावेळी शिवाजी खरमाळे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांना श्री बालाजी ट्रॅक्टर यांच्या वतीने पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.

स्वराज ग्राहक मेळाव्याच्या निमित्ताने स्वराज ट्रॅक्टरच्या नवीन स्वराज ट्रॅक्टर 733 FE व 735 FE मॉडेल चे अनावरण सोहळा पार पडला. याप्रसंगी श्री बालाजी ट्रॅक्टर चे सर्वेसर्वा संतोषशेठ भुजबळ, विलास सोनवणे, ॲड राजेंद्र कोल्हे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी शैलेश गायकवाड, विश्वास बढे,रवी काळे,अरगडे ,वाघापूर(संगमनेर)चे दादासाहेब शिंदे बंटीशेठ डोले ,सत्यवान पिंगळे, कैलास भोईर ,जंगल खरमाळे ,गणेशमहाराज गाडगे, सतीश पुंडे,बाबूशेठ तळपे , शहाजी भोर ,शांताराम बढे, सतीश बढे, रघुनाथ बढे, पांडुरंग भोर ,राजाराम भोर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे