पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वैभव सदाकाळ यांना जाहीर
1 min readवडगाव कांदळी:- पुणे जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा वैभव बबनराव सदाकाळ यांना जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावृद्धी यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. वैभव सदाकाळ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेरे (ता. जुन्नर) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

वैभव सदाकाळ यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला मागील वर्षी पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक प्राप्त झाला. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांच्या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून तीन लक्ष रुपयांचे बक्षीस मिळवले.

याशिवाय, त्यांनी विविध स्पर्धांमध्येही यश संपादन केले आहे. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तसेच शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेअंतर्गत तालुकास्तरावर शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी सृजनशील उपक्रम, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर आणि बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती या त्यांच्या कार्यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा सतत उंचावत आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सेवेला मिळालेली ही दाद त्यांना अधिक प्रेरणा देणारी ठरली आहे.