आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

आईच्या मांडीवर डोकं ठेवलं, कोल्हापुरात 10 वर्षांचा मुलगा कायमचा निजला

1 min read

कोल्हापूर :- कोल्हापुरात घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण गावासह परिसर शोकाकुल झाला आहे. अवघ्या दहा वर्षाच्या मुलाने खेळता खेळताच आईच्या कुशीत विसावत आपले प्राण सोडले आहेत. मित्रांसोबत खेळायला गेलेला श्रावण परत आला तो आईची शेवटची भेट घेण्यासाठी, असाच काहीसा प्रसंग कोल्हापुरच्या गावडे कुटुंबावर ओढवला आहे.

पन्हाळ्याच्या कोडोली येथील आनंदनगर वसाहतीमध्ये शिवनेरी गल्ली येथे गावडे कुटुंब आनंदी आनंदात राहत होतं. या गावडे कुटुंबातील श्रावण अजित गावडे हा चौथीच्या वर्गात शिकणारा मुलगा आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सर्वत्र सुरु असतानाच बुधवारी रात्री श्रावण इतर मुलांसोबत खेळत होता. मात्र अचानक आईच्या मांडीवर खेळकरपणे विसावलेल्या दहा वर्षांच्या श्रावण गावडे या चिमुकल्याचा अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी श्रावणला तातडीने रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. श्रावण हा गावडे दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. श्रावणच्या अशा पद्धतीने अचानकपणे जाण्यामुळे संपूर्ण परिसराला धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.

लहानांना येऊ शकतो का हृदयविकाराचा झटका?

कोल्हापुरातील हृदय रोगतज्ञ अक्षय बाफना यांनी सांगितलं आहे की, लहान मुलांना देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लहान वयामध्ये हृदय विकाराचा झटका येण्याची तीन प्रमुख कारणे असतात.

1) अनुवांशिक कारणांमुळे हृदयाची काम करण्याची क्षमता कमी असते. अशा वेळी जास्त धावपळ केल्यानंतर अचानक हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदय काम करणं बंद करु शकतं

2) हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या काही वेळा असामान्य असतात, त्यामुळे धावपळ करताना एकाएकी त्या चिमटून हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो. अशावेळी देखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे