पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
1 min readपुणे :- जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील २७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी दिली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दीन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या करिता जिल्ह्यातील २७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्रथम क्रमांक
जुन्नर – श्री. वैभव बबनराव सदाकाळ, येणेरे
आंबेगाव – श्री. विजय सोपानराव वळसे ,गाढवे गोरडे मळा
खेड – श्रीम. शैला मुकुंद गावडे, धानोरे
मावळ – श्री. पोपटराव रामचंद्र चौगुले, धामणे
मुळशी – श्री. रियाज नसर शेख, भुगाव क्र. २
पुरंदर- श्री. मनोज कुमार भालचंद्र सटाले, नाराणपूर
त्याचं बरोबर गुणवंत केंद्र प्रमुख पुरस्कारासाठी सौ.निर्मला दिलीप काळे केंद्र कान्हे, तालुका मावळ यांची निवड करण्यात आली.
उत्कृष्ट शाळा अध्यक्ष चपक पुरस्कारा करिता पुढील शाळांची निवड करण्यात आली.
१. अध्यक्ष चषक पुरस्कार १ ली ते ४ थी व ५ वी
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी, केंद्र गुंजाळवाडी, ता.जुन्नर- प्रथम
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव, केंद्र – खुटबाव, ता.दौंड- द्वितीय
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचर्णेवाडी, केंद्र करडे, ता.शिरुर – द्वितीय
४.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा, केंद्र – शेळगाव, ता. इंदापूर- तृतीय
५.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफगाव, केंद्र गुळाणी, ता. खेड – तृतीय
२. अध्यक्ष चषक पुरस्कार (इयत्ता १ ली ते ८ वी (उच्च प्राथमिक) )
१.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी, केंद्र सणसवाडी,ता.शिरुर – प्रथम
२.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी, केंद्र कुरुळी ता. खेड – द्वितीय
३.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडी, केंद्र हिवरे तर्फे ना.गाव, ता. जुन्नर – तृतीय
४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुळे, केंद्र – मांरुजी, ता. वेल्हे –
तृतीय