आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडीत ५१ विद्यार्थिनींना मिळणार सायकल

1 min read

वडगाव कांदळी :- नगदवाडी (ता. जुन्नर )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सायकल बँक उपक्रमांतर्गत ५१ सायकलचे वितरण, नवीन वर्गखोली व अंगणवाडीचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शुभहस्ते बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजता नगदवाडी येथे संपन्न होणार आहे .कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या पुढाकारातून व नगदवाडी गावातील दानशूर व्यक्तींच्या सहभागातून ५१ सायकलचे वाटप विद्यार्थिनींना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे पंचायत समिती जुन्नर चे गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे उपस्थित राहणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समिती व शाळा सल्लागार समिती जिल्हा परिषद शाळा नगदवाडी यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे