आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

ओतुर येथील इंजीनिअरींग कॉलेजमधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

1 min read

वडगाव कांदळी:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी ओतुर येथे सोमवार दिनांक १५.९.२०२५ रोजी प्रथम वर्ष विद्यार्थांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला .

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ओतुरचे एपीआय लहु थाटे, महाविद्यालयीन माजी विद्यार्थी अमोल काळे ( लीन टेक्नॉलॉजीस टॅलेंट ऑपरेशन्स अँड ऑन बोर्डींग मॅनेजर), ज्ञानेश्वर ढोमसे ( ज्ञाता एज्युकेशन्स रिसर्च अँड कौन्सिलींग सेंटर), महाविदयालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात, संगणक विभागप्रमुख डॉ सुनिल खताळ, आर्टीफिशीयल अँन्ड मशिन लर्निंग विभागप्रमुख डॉ पुजा घोलप, इलेक्टॉनिक्स अँन्ड टेलीकम्युनिकेशन्स विभागप्रमुख निता बाणखेले, मेकॅनिकल विभागप्रमुख सचिन जाधव प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक सिध्दार्थ पानसरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व महाविदयालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रमुख पाहुणे एपीआय लहु थाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अभियांत्रिकीचे शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसुन समाजासाठी नाविण्यपुर्ण तंत्रज्ञान विकसीत करण्याची संधी आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केल्यास भविष्यात यश निश्चित आहे तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना शिस्त, आदर आणि महाविद्यालयाने घातलेले नियम पाळावेत. त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थांना एमपीएससी युपीएससी हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे असे सांगुन त्याचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. तसेच महाविदयालयीन माजी विद्यार्थी अमोल काळे यांनी आपल्या भाषणात आजच्या डिजीटल युगात तांत्रिक कौशल्याबरोबर संवादकौशल्य, टीमवर्क आणि समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे.

कंपनीचा इंटरव्हयु देण्यासाठी इंडस्ट्री कॉरपोरेट कसा आत्मसात करावा याची सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रात ज्ञानेश्वर ढोमसे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये विद्यार्थाना प्रोत्साहन देताना म्हटले की, शिक्षणात कल्पकता आणि चिकाटी असेल तर उदयो जगता मध्ये करीअर घडवणे सहज शक्य होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात यांनी विदयार्थ्यांना महाविदयालयीन जीवनाचा उपयोग केवळ अभ्यासापुरता न ठेवता संशोधन प्रकल्प व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. असे सांगुन विद्यार्थ्याचे स्वागत केले व सुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पुजा घोलप यांनी केले. तर प्रथम वर्ष समन्वयक सिद्धार्थ पानसरे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे