आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

कांदळीत रस्त्यांच्या नोंदीसाठी विशेष ग्रामसभा संपन्न

1 min read

वडगाव कांदळी:– ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची नोंद व कायदेशीर अभिलेख तयार करण्याचा उपक्रम जुन्नर तालुक्यात सुरुवात झाली असून या अंतर्गत तालुक्यातील १८५ गावातील नकाशावर उपलब्ध असणाऱ्या तसेच वहिवाटीचे रस्ते ,पानंद रस्ते , शिवरस्ते शेतरस्ते यांची नोंद करून विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी सांगितले.

कांदळी गावातील ६ रस्ते, नगदवाडी गावातील ५ रस्ते हे गाव नकाशावर आहेत .मात्र गाव नकाशावर नसलेले कांदळी गावातील ३७ रस्ते, नगदवाडी गावातील २२ रस्ते वहिवाटीचे, पानंदरस्ते, शेत रस्ते यांची स्वतंत्र नोंद करण्यात येणार असून कांदळी (ता. जुन्नर) ग्रामसभेची मान्यता घेतली असून या रस्त्यांचा ग्राम महसूल १ फ नमुना तयार होणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी एस. एम .गाडगे यांनी दिली. या ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देण्यात येणार असून जीआयएम प्रणाली द्वारे रस्त्यांची नकाशावर नोंद करण्यात येणार आहे. ग्रामसभेसाठी ग्राम महसूल अधिकारी एस. एम. गाडगे, ग्रामविकास अधिकारी रंजना रघतवान, कृषी सहाय्यक सुप्रिया डेरे, ग्राममहसूल सेवक अनिल शिंदे ,संजय बढे, कांदळीच्या सरपंच डॉ. पल्लवी विक्रम भोर, उपसरपंच विशाल रेपाळे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा बढे, निलेश बढे ,नंदा बढे ,अनिल भोर ,ऋषिकेश भोर ,साधना भोर, मनीषा वाघुले ,प्रियंका घाडगे, रेखा घाडगे ,विनायक गुंजाळ, रेश्मा फुलवडे, सुनिता रोकडे ग्रामपंचायत लिपिक उत्तम गुंजाळ ,अनिल घोडेकर, बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे ,खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,नगदवाडी सोसायटीचे चेअरमन सुरेश बढे ,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण गुंजाळ, पोलीस पाटील अरुण भालेराव, निवृत्ती बढे ,महेश बढे ,दयानंद बढे,शांताराम बढे,पिराजी भोर, सुनील गुंजाळ, बन्सी गुंजाळ, सचिन बढे ,सुनील कुतळ ,सोमनाथ कुतळ, प्रदीप गोपाळे ,संदीप घाडगे, आत्माराम गुंजाळ ,जितेंद्र फुलवडे ,मंगेश रेपाळे ,गोविंद कुतळ ,अविनाश रेपाळे ,संदीप रोकडे, उत्तम शिंदे, देवराम थोरात, गोरक्षनाथ गुंजाळ ,रामदास गुंजाळ, रवी गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदळी व नगदवाडी गावातील वहिवाटीचे रस्ते ,पानंदरस्ते, शिवरस्ते ,शेतरस्ते याची पाहणी करून त्यास विशिष्ट क्रमांक देण्यासाठी ग्राममहसूल अधिकारी एस. एम .गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे