हिंदमाता विद्यालयात ग्रामस्थांतर्फे सायकल वाटप
1 min readवडगाव कांदळी :- येथील हिंदमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दूरवरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असल्याने सायकल घेण्याचा खर्च परवडत नाही. शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा पाहून स्वातंत्र्यदिनी क्रीडा शिक्षक किसन यादव यांनी ग्रामस्थांना गरजू विद्यार्थ्यांना सायकल देण्याचे आवाहन केले .त्यानुसार दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना सायकल देण्याचे मान्य केले यामध्ये उद्योजक नवनाथ मुटके यांनी पाच सायकल, सोनल कन्स्ट्रक्शन मुंबई रामदास निलख, संदीप व अमोल पाचपुते, शंकर पाचपुते , शोभा पाचपुते, माजी मुख्याध्यापक भास्कर पाचपुते , विविध कार्यकारी सोसायटी, श्री बिरोबा महाराज पतसंस्था, श्री साईलक्ष्मी पतसंस्था, श्री बिरोबा महाराज दूध संस्था यांनी प्रत्येकी एक सायकल याप्रमाणे १४ सायकल मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या.

या सायकल प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी कस्टम अधिकारी बी.बी. लांडगे साहेब यांनी भूषविले. याप्रसंगी सरपंच उल्काताई श्रीकांत पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, उद्योजक नवनाथ मुटके, माजी सरपंच रामदास पवार, ज्ञानेश्वर निलख, साईलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.श्रीकांत पाचपुते , बिरोबा पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलख, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय मुटके, श्री बिरोबा दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शोभा पाचपुते, उद्योजक सोपान पाचपुते, माजी आदर्श शिक्षक बबन पाचपुते , शिक्षण प्रेमी रियाजत पठाण, सामाजिक कार्यकर्ते बाबाजी लांडगे, माजी सरपंच भागुजी पाचपुते, सेवानिवृत्त लिपिक रवींद्र पाचपुते, माजी विद्यार्थी दीपक मुटके ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाशजी बोरा, उपाध्यक्ष जितेंद्र बोरा यांनी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव यांनी देणगीदारांचा व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार केला. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले प्रास्ताविक व अध्यक्ष निवड मधुकर शिंदे तसेच सूत्रसंचालन किसन यादव यांनी केले.नंदकिशोर कुटे यांनी आभार मानले.