आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

नगदवाडीत अन अकॅडमी इन्स्टिट्यूट तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

1 min read

वडगाव कांदळी:-न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी, कांदळी (ता.जुन्नर)येथील विद्यार्थ्यांना अकॅडमी इन्स्टिट्यूट तर्फे करिअर मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अकॅडमीचे अनंत देशपांडे व रिया मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील दिशा शिक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन केले दहावीनंतर घ्यावयाच्या विविध कोर्सेस विविध शाखांबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचे काम त्यांनी केले जेईई व नीट या परीक्षानबाबतही विद्यार्थ्यांना त्यांनी सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत त्यांच्या मनातील शंका व भविष्यातील वेध यांचा यथायोग्य परामर्श घेऊन भविष्यातील येणाऱ्या अडीअडचणींचा व समस्यांचा वेध त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना करून दिला या अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. दीपक घाडगे यांनी दिली यावेळी शिक्षक दिलीप तोतरे , संकल्प चासकर, राजेश जाधव, संगीता गाडेकर ,रमेश वारुळे चंद्रकांत घाडगे, मंगेश रोकडे बबन भालेराव व अनिल गुंजाळ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगला शैक्षणिक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याबद्दल डॉ.

दीपक घाडगे यांनी अकॅडमीचे आभार मानले पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी निश्चितच या अकॅडमी मधून शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करतील अशी अपेक्षा अकॅडमी चे आनंद देशपांडे व रीया मॅडम यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे