वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून अनाथालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
1 min readबेल्हे (संदीप शितोळे) :- वाढदिवसावर होणारा हजारो रुपये खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने स्वप्नवेध अनाथालय मंगरूळ पारगाव या ठिकाणी उमेश शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी स्वप्नवेध अनाथालय संस्थापक शिवव्याख्याते सचिन भोजणे आणि मंगल सचिन भोजणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविका सचिन भोजणे यांनी मांडली व आभार श्री उमेश शितोळे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी सुमित शिरतर, काळूराम बोराडे, पोपट शितोळे, अमोल भुजबळ, रामदास शिंदे, गौरव शिरतार, करण शिरसाठ, जयेश लामखडे, संपत शितोळे, ओमकार मोरे, विकास बोराडे, कुणाल शितोळे,सुरेखा शितोळे, मोहिनी शितोळे हे सर्व मंडळी उपस्थित होते.
प्रास्ताविक मांडत असताना सचिन भोजणे यांनी माणुसकीची जाणीव करून दिली. आभार मानत असताना उमेश शितोळे यांनी शब्द दिला की यापुढील काळात आम्हा युवकांकडून या अनाथालयास तसेच विद्यार्थ्यांना नेहमीच मदत होत राहील. शेवटी मुलांना शालेय वस्तू व खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.