आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

वडगाव कांदळी आरोग्य शिबीर संपन्न 

वडगाव कांदळी: – महाराष्ट्र शासन स्वस्थ नारी सशक्त परिवारअभियानांतर्गत ग्रामपंचायत वडगाव कांदळी येथे शनिवारी (दि.२०) रोजी गावातील महिला पुरुष यांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डोळे तपासणी, बीपी व शुगर तपासणी तसेच किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५० महिला, पुरुष व मुलींची तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यम जाधव व आरोग्य सहाय्यक विनायक वांडरे ,आरोग्य सेवक नितीन निघोट ,आरोग्य सेविका मीरा लामखडे, वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्काताई पाचपुते ,उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच रामदास पवार, ग्रामविकास अधिकारी रिया इनामदार, बाबुराव निलख,रामदास निलख दिगंबर शिंदे ,चंद्रकांत शिंदे, राठोड, हिंदमाता विद्यालयातील शिक्षिका यादव, गायकवाड ,जयसिंग फुलसुंदर, सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यम जाधव यांनी किशोरवयीन मुलींना शारीरिक स्वच्छता, आहार व मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे