गोवर – रुबेला लसीकरण शिबिराचे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव येथे आयोजन
1 min readगोवर – रुबेला लसीकरण शिबिराचे प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी व आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र धामणगाव यांच्या वतीने यशस्वी आयोजन
डहाणू:- केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात १५ ते ३० सप्टेंबर गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमधल्या ५ ते १५ वर्षे वयोगटातल्या बालकांना या लशीचा एक अतिरीक्त डोस दिला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित केलं जाणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून आज दि. २२ सप्टेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट व वैद्यकीय अधिकारी धुंदलवाडी डॉ. माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी कार्यक्षेत्रातील आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव येथे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी धुंदलवाडी डॉ. ऐश्वर्या पाटील व डॉ.सिराज शेख यांच्या हस्ते झाले.

गोवर व रुबेला या संसर्गावर विशिष्ट औषध उपलब्ध नसल्यानं लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी,” असे आवाहन डॉ. ऐश्वर्या पाटील यांनी केले. या लसीकरण मोहिमेअंतर्गत शाळेतील ९६ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी येथील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी हेमेंद्र पाटीदार, भाग्यश्री पडावी, विनी रजवाडी, अमोल चव्हाण, आरोग्य साहाय्यक विजय जाधव आरोग्य सहाय्यीका लता काटेला, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गट प्रवर्तक उपस्थित होते. या लसीकरणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोळंखे सर, अधीक्षक श्री.गेडाम सर तसेच शाळेच्या आरोग्य सेविका कु. रंजना वेडगा यांनी मोलाचे सहकार्य लाभले. हे लसीकरण शिबीर आयोजनासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर धामणगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी रमीला धोधडे, आरोग्य सेविका सरिता दुमाडा व वासंती वावरे , आशा व अंगणवाडी सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.