आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

अनुदानित आश्रमशाळा चिंचले येथे ३५० विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लसीचे लसीकरण

1 min read

धुंदलवाडी:- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून आज दि. २४ सप्टेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट व वैद्यकीय अधिकारी धुंदलवाडी डॉ. माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी कार्यक्षेत्रातील बालक मंदिर संस्था कल्याण संचालित अनुदानित आश्रमशाळा चिंचले येथे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी धुंदलवाडी डॉ. सिद्धि मटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ. योगेश गायकवाड, डॉ. अमित तुरकाने व डॉ.सिराज शेख उपस्थित होते.

गोवर आणि रुबेला हे अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहेत, ज्यामुळे गंभीर आजार, कायम स्वरूपी आरोग्यविषयक गुंतागुंत आणि मृत्यू देखील होऊ शकतो. या आजाराचा उच्च संसर्ग दर लक्षात घेता, भारताने २०२५ सालापर्यंत या आजारांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात १५ ते ३० सप्टेंबर गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जात असून त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमधल्या ५ ते १५ वर्षे वयोगटातल्या बालकांना या लशीचा एक अतिरीक्त डोस देण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित केलं जात आहेत.

गोवर व रुबेला या संसर्गावर विशिष्ट औषध उपलब्ध नसल्यानं लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी,” असे आवाहन डॉ. सिद्धि मटकर यांनी केले.

या लसीकरण मोहिमेअंतर्गत शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धुंदलवाडी येथील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी भाग्यश्री पाडवी, विनी रजवाडी, अमोल चव्हाण, पूजा भोईर, रमिला धोंधड़े, आरोग्य साहाय्यक विजय जाधव आरोग्य सहाय्यीका लता गायकवाड, व कविता मोहनकर , सर्व आरोग्य सेविका कुसुम ठाकरे, प्रगती मेढा , कलावती तांडेल, सरिता धुमाडा, आरोग्य सेवक,विक्रम कोरडा, नाथा चव्हाण, संदीप पवार, राहुल, उमेश वड, रुग्णवाहिका चालक प्रेमचंद मिस्त्री, गट प्रवर्तक उपस्थित होते.

या लसीकरणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील प्रधान, श्री. घनश्याम वरठा सर, अधीक्षक श्री भरत धीरड़े सर अधीक्षीका सुंदर वड़ोला तसेच शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

     

हे लसीकरण शिबीर आयोजनासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर आबोली येथील समुदाय आरोग्य अधिकारी हेमेन्द्र पाटीदार, आरोग्य सेविका लता गरेल व शीला गवा, आशा व गट परिवर्तक यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे