अनंत पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
1 min read- अनंत पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
सभासदांना १५ टक्के लाभांशासह दीपावली भेटवस्तू
वडगाव कांदळी :- अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित १४ नंबर, नगदवाडी,कांदळी (ता.जुन्नर) या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन, कांदळी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विक्रमशेठ भोर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात अंजली मंगल कार्यालय, नगदवाडी येथे पार पडली . यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली .यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन उत्तम शिंदे, सचिव देवराम भोर, खजिनदार रवींद्र बढे, संचालक सुधीर भोर, अरुण भोर, अनिल यादव ,सतीश कुतळ ,अशोक बढे ,जयराज रजपूत, बाबासाहेब त्रिभुवन, सुनंदा भोर, प्रमिला घाडगे, संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक ऋतू टेंभेकर, वसुली अधिकारी संदीप पाटील ,अंकिता नेहरकर,पद्मा भोर, हेमलता भोर , संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक डी. बी. औटी ,कांदळी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉ. पल्लवी भोर , टॅक्स ऑडिटर राजकुमार कोल्हे,नगदवाडी सोसायटीचे चेअरमन सुरेश बढे, व्हाईस चेअरमन दिनेश कुतळ,कांदळी गावचे माजी उपसरपंच अनिल भोर, सुदर्शन बढे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोर, विनायक गुंजाळ, नंदा बढे, अशोक सहकारी बँकेच्या संचालिका अलकनंदा हांडे, तबाजी गुंजाळ, हरिभाऊ भोर,नारायण भोर, भागाजी भोर,सोमनाथ रेपाळे ,विश्वास बढे, कारभारी भोर ,गंगाराम भोर, विजय भोर, विश्वास बढे , पिराजी भोर,शांताराम बढे, गणेश भोर , निवृत्ती बढे, अजाबा भोर, कोंडीभाऊ बढे, सतीश बढे , अशोक जगताप, नवनाथ नेंद्रे ,सुभाष बढे, अनंथा बढे , रत्नाकर जगताप यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे चे प्रशिक्षक केदारी यांनी सभासदांना आपली कर्तव्य , जबाबदारी व आपले हक्क याविषयी मार्गदर्शन केले. कारभारी भोर,नारायण भोर, गणेश कुतळ निवृत्ती बढे, पद्माकर साबळे, पंढरीनाथ भोर यांच्यासह अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
१९९० साली स्थापन झालेल्या अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे १हजार ५०७ सभासद असून स्वनिधी ३ कोटी४६ लाख रुपयांचा आहे. ठेवी १७कोटी ६६लाख रुपयांच्या असून गुंतवणूक ७ कोटी २०लाख रुपये आहे.२०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेने १०कोटी १०लाख रुपयाचे कर्जवाटप केले आहे. संस्थेला ४२ लाख १४ हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून संस्थेला ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे. संस्थेमध्ये संगणकीकृत सेवा असून विजबिल भरणा केंद्र आहे. अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही सभासदांना सतत १४वर्षे १५ टक्के लाभांश व आकर्षक भेटवस्तू देणारी जुन्नर तालुक्यातील महत्वपूर्ण पतसंस्था आहे.

या पतसंस्थेला सतत १२ वर्ष ऑडिट वर्ग अ मिळालेला असून मोबाईल बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस सुविधा, नेट बँकिंग, सोनेतारण कर्ज एटीएम सुविधा उपलब्ध असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विक्रम भोर यांनी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संतोष मुळे यांनी केले तर अहवाल वाचन सचिव दयानंद भोर यांनी केले.