आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सल्लागारपदी प्रा.श्रीकांत पाचपुते

1 min read

वडगाव कांदळी :- वडगाव कांदळी (ता. जुन्नर )येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाचपुते यांची जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित वल्लभ बेनके यांनी दिली. सहकार क्षेत्रातील योगदान हे समाज हिताच्या दृष्टीने उल्लेखनीय असल्याने जुन्नर तालुक्यातील सहकाराचा प्रसार व वाढ करण्याच्या दृष्टीने पतसंस्था फेडरेशनच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके व उपाध्यक्ष गुलाब नेहरकर यांनी सांगितली.


प्रा.श्रीकांत पाचपुते यांनी ७ वर्षांपूर्वी साईलक्ष्मी पतसंस्थेची स्थापना केली असून स्थापनेपासून संस्थेत ऑडिट वर्ग अ असून संस्थेने अल्पावधीत मोठी भरारी घेत सभासदांना १५ टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याची अखंड परंपरा कायम राखली आहे.

­
पतसंस्था फेडरेशनच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .निवडीबद्दल जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय खेडकर, कांदळी चे माजी सरपंच रामदास पवार, माजी उपसरपंच शरद पाचपुते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे