जय भवानी माता मंदिर केळुंगण- माळेगाव येथे पायी ज्योत सोहळ्याचे जल्लोषात स्वागत…
1 min readकेळुंगण( मनोहर भांगरे) :- अकोले तालुक्यातील केळुंगण येथील जय भवानी माता मित्र मंडळच्या वतीने घटस्थापने निमित्ताने मागील सात वर्षापासून पायी ज्योत देवीच्या विविध ठिकाणावरून आणली जाते.

यावर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एकविरा आई मंदिर कार्ले ते केळुंगण माळेगाव पायी ज्योत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या ज्योतीचे गावात आगमन होताच परिसरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

घटस्थापने निमित्ताने मागील सात वर्षापासून जय भवानी माता मित्र मंडळाच्या वतीने भव्य नवरात्री उत्सव साजरा केला जातो. या वर्षीही भव्य दिव्या नवरात्री उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून दहा दिवस भजन, देवीची गाणी, जागरण गोंधळ व शेवटच्या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही पायी ज्योत यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.तरुणांच्या सहभागामुळे या मंडळाच्या कार्याला विशेष ओळख मिळाली आहे.हा उत्सव म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरत आहे.