वडगाव कांदळीत मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान
1 min readवडगाव कांदळी:- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील शेत रस्ते,पानंद रस्ते, शिवरस्ते यांच्या नोंदीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली .मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री मैड उपस्थित होते .त्यांनी या अभियाना विषयी सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. या अभियानाचा शुभारंभाचे थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना दाखवण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून स्वच्छता, आरोग्य व वृक्ष संवर्धन याविषयी घोषवाक्य देऊन मुलांनी गाव परिसरात जनजागृती केली तसेच शिवरस्ते, पानंद रस्ते यांची स्वतंत्र नोंद करण्यात येणार असून वडगाव कांदळीत ग्रामसभेची मान्यता घेतली असून रस्त्यांचा ग्राम महसूल एफ नमुना तयार होणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी विद्युलता यादव यांनी दिली. या ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देण्यात येणार असून जी आय एम प्रणाली द्वारे रस्त्यांची नोंद नकाशावर करण्यात येणार आहे. वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्काताई पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली.

ग्रामसभेसाठी ग्राम महसूल अधिकारी विद्युलता यादव, महसूल सेवक किरण ढोबळे, उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच रामदास पवार, ग्रामपंचायत सदस्य सचिन निलख,जिजाभाऊ भोर, पंढरीनाथ पाचपुते, सुवर्णा मुटके ,संगीता भोर ,शुभांगी निलख, सुजाता लांडगे, शायदा पठाण, गावचे पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते, बिरोबा महाराज दूध संस्थेचे चेअरमन संदेश पाचपुते, बिरोबा ग्रामविकास ट्रस्टचे सचिव बबन पाचपुते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.