आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

ओतूरच्या शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उपक्रम साजरा

1 min read

वडगाव कांदळी:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर या ठिकाणी महाविद्यालयीन अंतर्गत शुक्रवार दिनांक 26/09/2025 रोजी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा उपक्रम राबविण्यात आला.

               
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जी यु खरात,संगणक विभागप्रमुख डॉ. सुनील खताळ,एआयएमएल विभागप्रमुख डॉ. पूजा घोलप,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक कम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा नीता बानखेले,मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा सचिन जाधव, महाविद्यालय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोनिका रोकडे, सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट टू स्मार्ट इंडिया कार्यक्रम समन्वयक प्रा पल्लवी घोलप,कार्यालय अधीक्षक विशाल बेनके सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               
या उपक्रमामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व ते सर्व विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरल्याबद्दल सर्वांचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभिनंदन केले. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन म्हणजे हा एक प्रतिष्ठित देशव्यापी उपक्रम असून ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे.आणि व्यवहारिक समस्या सोडवण्याच्या क्षमतेला चालना देणे . हा उपक्रम वास्तविक जगातील समस्यांवर समाधान विकसित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी एक गतिशील प्रकारचे व्यासपीठ आहे .सहभाग विद्यार्थ्यांना गंभीरपणे व नाविन्यपूर्ण विचार करण्यास प्रोस्ताहित करून शैक्षणिक ज्ञान आणि त्याच्या व्यवहारीक उपयोगामधील अंतर भरून काढणे हा या उपक्रमापाठीमागील उद्देश असुन सुरुवातीपासूनच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये या प्रणालीने चौकटी बाहेरचे विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे . त्याचबरोबर उद्योगतज्ञ सहकारी संस्था आणि इतर भागधारकांसोबत सहयोग करण्यासाठी हा उपक्रम प्रोत्साहित करतो .या उपक्रमासाठी डॉ . सुनील खताळ आणि डॉ . पूजा घोलप हे विद्यार्थी निवडीसाठी परीक्षक म्हणून लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे