आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान

1 min read

  वडगाव कांदळी:- न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी, कांदळी (ता.जुन्नर ) या विद्यालयात जनजागृती अभियानांतर्गत एड्स ,कॅन्सर ,टीबी य हे जीवघेणे आजार व साथीचे आजार होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे बदल याविषयी मार्गदर्शन नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संदेश थोरात व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रय रोकडे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व आजाराबाबतची पूर्ण माहिती दिली.


याप्रसंगी बोलताना त्यांनी आहाराचे महत्त्व त्याचप्रमाणे किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे बदल व घ्यावयाची काळजी याबाबतही विस्तृत विवेचन केलेअसल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. दीपक घाडगे यांनी दिली पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक दिलीप तोतरे यांनी करून दिला याप्रसंगी विद्यालयातील विज्ञान शिक्षिका संगीता गाडेकर , राजेश जाधव , संकल्प चासकर , रमेश वारुळे , मंगेश रोकडे , चंद्रकांत घाडगे ,अनिल गुंजाळ व बबन भालेराव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे