आवाज महाराष्ट्राचा

जन माणसाचा हक्काचा आवाज

शरदचंद्र पवार कॉलेजमधील द किरण अकॅडमी मध्ये ७ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

शरदचंद्र पवार कॉलेजमधील द किरण अकॅडमी मध्ये ७ विद्यार्थ्यांची निवड
वडगाव कांदळी:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ओतूर मधील मंगळवार दिनांक ७/१०/२०२५ रोजी द किरण अकॅडमी,पुणे या संस्थेचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले .
कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रमाच्या दिपप्रज्वलनावेळी द किरण अकॅडमी पुणेच्या मॅनेजर शुभांगी ढवळे तसेच टीम लिडर गौरव छाडी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी यु खरात,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी राहुल बनसोडे,संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ, एआयएमएल विभागप्रमुख डॉ पूजा घोलप, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक नीता बानखेले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
द किरण अकॅडमी या संस्थेने प्रथमतः कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची ॲप्टीटयुड टेस्ट नंतर ग्रुप डिस्कशन करून त्यामधून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचे पर्सनल इंटरव्हयू घेतली गेली. त्यामधून एकूण सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक राहुल बनसोडे यांनी केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी यु खरात यांनी दिली. व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय विशालशेठ तांबे, मानद सचिव वैभवशेठ तांबे यांनी केले आणि विद्यार्थ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे