शरदचंद्र पवार इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांची विप्रो आणि प्रायरो या कंपन्यांमध्ये निवड
1 min readवडगाव कांदळी- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर येथील संगणक विभागातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या श्री पियुष देशमुख या विद्यार्थ्याला प्रायरो सिस्टीम या कंपनीने 6.7 लक्ष पॅकेज तर शब्बार पूनावाला व आशिष शिंदे या विद्यार्थ्यांना विप्रो या कंपनीमध्ये पाच लक्ष पॅकेज वर निवड झाली . या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात यांनी महाविद्यालयामध्ये सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत निवड झाल्याबद्दल सन्मान करून शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सत्काराचा स्विकार करताना महाविद्यालयात मिळालेले बेसिक नॉलेज,कोडींगची प्रॅक्टिस व महाविद्यालयातून उत्कृष्टरित्या घेतलेले प्रॅक्टिकल्स याची मुलाखतीच्या वेळी खूप मदत झाली. सर्व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन नियमित केलेले कॉलेज व घेतलेली मेहनत हे यशाचे रहस्य आहे असे विचार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले .
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय विशालशेठ तांबे व मानद सचिव माननीय वैभवशेठ तांबे यांनी अभिनंदन करून पुढील प्रगतीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.