सीईओ गजानन पाटील यांची नगदवाडी शाळेस भेट
1 min readसीईओ गजानन पाटील यांची नगदवाडी शाळेस भेट
वडगाव कांदळी:- पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नगदवाडी शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली. गजानन पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायकल बँक ही संकल्पना सुरू केली या संकल्पनेअंतर्गत नगदवाडी (ता. जुन्नर) येथे कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या नेतृत्वाखाली दानशूर व्यक्तींनी ५१ सायकली विद्यार्थिनींना वाटप केल्या होत्या.

नगदवाडी येथे नवीन वर्गखोली व अंगणवाडीचा भूमिपूजन समारंभ गजानन पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.५)पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जिल्हा परिषदेचे मॉडेल स्कूल प्रकल्पाचे समन्वयक सिद्धार्थ चव्हाण, जुन्नरचे गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, यश मस्करे, केंद्रप्रमुख वनिता हांडे, मुख्याध्यापक सखाराम शेंडकर,मंगेश मेहर, पंडित चौगुले, निलेश शेलार विद्या वाघ, अशा आरेकर, सुप्रिया अभंग,उज्वला पोटे उपस्थित होते.

यावेळी कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे ,जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे ,सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बढे, ग्रामविकास अधिकारी रंजना रघतवान,सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनेश कुतळ, कांदळी चे उपसरपंच विशाल रेपाळे, अनिल भोर, ग्रामपंचायत सदस्य नंदा बढे, रेश्मा फुलवडे ,गणपत रोकडे, सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी बढे ,महेश बढे,दयानंद बढे, विश्वास बढे ,सिद्धार्थ बढे, सुरेश कुतळ, विशाल कुतळ, संकेत बढे ,रघुनाथ बढे,रवी काळे, अशोक जगताप, निवेदक अक्षय बढे ,बाबू घाडगे, आशिष घाडगे, अमोल घाडगे, जितेंद्र फुलवडे, सोमनाथ कुतळ, योगेश बढे ,राजू कुतळ, सचिन शिंदे, नवनाथ भोर, धोंडीभाऊ काळे ,राजू नायडू, बाळू काळे ,गुलाब घाडगे, संतोष बढे,मंगेश कोकणे, जितेंद्र शिंदे, भिवाजी शिंगोटे, अभिजीत बढे ,नवनाथ नेंद्रे, अरुण बढे,नवनाथ जोरे, शांताराम बढे,अनिल घोडेकर, रणजीत चव्हाण, बाळकृष्ण हांडे, हनुमान कुतळ ,रखमा मुटके, संतोष बढे, भावना बढे,दिपाली जाधव , शांता बढे ,अक्षदा जाधव ,नीलम बढे, नंदा बढे ,नेहा कोकणे, सुरेखा जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी कांदळी गावातील शैक्षणिक संस्थांचा आढावा घेत बाळासाहेब बढे यांच्यासह सायकल बँक योजनेला योगदान दिलेल्या ग्रामस्थांचे कौतुक केले. शैक्षणिक सोयीसुविधांसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी नगदवाडी ग्रामस्थ व कांदळी ग्रामपंचायत वतीने सन्मान करण्यात आला.