जय किसान भाजीपाला गटाकडून सभासदांना दिवाळी फराळ वाटप
1 min readजय किसान भाजीपाला गटाकडून सभासदांना दिवाळी फराळ वाटप
वडगाव कांदळी:- येडगाव (ता. जुन्नर )येथील जय किसान सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गटाकडून संस्थेच्या सर्व सभासदांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. ग्राहकाला दर्जेदार सेंद्रिय भाजीपाला मिळावा यासाठी येडगाव येथील शेतकरी एकत्र येऊन सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गट तयार केला आहे. या गटामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते .शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन व एकमेकाचा सल्ला या शेतकऱ्यांना उपयोगी ठरत आहे. या भाजीपाला उत्पादक गटामार्फत शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मोठी मदत झाली आहे. दिवाळी फराळ वाटपाचे वेळी सेंद्रिय शेती उत्पादक गटातील सर्व सदस्य उपस्थित होते. सभासदांना दिवाळी फराळ वाटप केल्यामुळे सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला.

जय किसान सेंद्रिय गटामार्फत शेतकऱ्यांना विविध गोष्टींची त्याचप्रमाणे सरकारी योजनांची माहिती देण्यात येते त्या मार्फत सर्व सदस्यांना नेहमीच शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती गटाचे अध्यक्ष प्रकाश नेहरकर यांनी दिली. यावेळी अध्यक्ष प्रकाश नेहरकर ,जयसिंग भिसे, कारभारी नेहरकर, शिवाजी पाटील नेहरकर, गंगाधर भोर, गणेश भिसे ,मच्छिंद्र नेहरकर, वैभव भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
